Jump to content

सिंहस्थ कुंभमेळा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Vishnupatil (चर्चा | योगदान)द्वारा २३:५०, २७ फेब्रुवारी २००९चे आवर्तन

dar bara varshatoona kumbhameLa nashik yethe bharato. tyaacapramaane to trimbakeshwar yethehee bharayto he bhaarataateela ekameva thikaana aahe kee jethe dona thikaanee baaraa varsaatoon kumbhamela bharato समुद्रन मंथनाने जो अमृतकुंभ समुद्राच्या बाहेर निघाला तेव्हा देवांना प्रश्न पडला की, जर दानवांनी हे अमृत प्राशन केले तर हे दानव अमर होऊन देव व मनुष्य यांना सळो की पळो करून सोडतील. तेव्हा देवांनी इंद्र पुत्र जयंता याला अमृतकुंभ घेऊन आकाश मार्गे पलायन करण्यास सांगितले. या अमृतकुंभाला देवांपासून प्राप्त करण्यासाठी दानवांनी देवांशी १२ दिवस भयंकर युद्ध केले. या युद्धकाळी अमृतकुंभामधून काही थेंब पृथ्वीवर पडले. हे अमृताचे थेंब हरिद्वार,प्रयाग,उज्जैयिनी व श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे पडले.चंद्राने कलशामधुन अमृत सांडतांना वाचविले, सुर्याने अमृतकलश्यास फुटू दिले नाही व बृहस्पतींनी राक्षसांपासून रक्षण केले म्हणून जेव्हा सुर्य,चंद्र व बृहस्पती कुंभ राशित प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरतो. जेव्हा बृहस्पती आणि सुर्य सिंह राशित प्रवेश करतो आणि आमावास्या असते, तेव्हा गोदावरीच्या उगमस्थानावर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरात सिंहस्थ कुंभमेळा भरतो.