Jump to content

खाल्का नदी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

खाल्का नदी तथा खाल्खिन गोल (मोंगोलियन:Халх гол; चिनी भाषा:哈拉哈河) ही पूर्व मंगोलिया आणि चीनच्या आंतरिक मंगोलियामधील नदी आहे.[]

मोठ्या खिंगान पर्वतरांगेत उगम पावणारी ही नदी पुढे जाता दोन उपनद्यांत विभागली जाते. दोनपैकी डावी शाखा बुइर सरोवरास मळते व तेथून ओर्चुन गोल नावानी पुढे वाहते. शारिल्जीन गोल नावाची उजवी शाखा सरोवरास न मिळता ओर्चुन गोलला मिळते.

३१ मे, १२२३ रोजी चंगीझ खान आणि पूर्व स्लाव्हिक सैन्यांमध्ये येथे लढाई झाली होती. त्यात चंगीझ खानचा विजय झाला.

मे ते सप्टेंबर १९३९ दरम्यान या नदीच्या प्रदेशात खाल्किन गोलच्या लढाया लढल्या गेल्या. सोव्हिएत संघजपानमधील या लढायांत सोव्हिएत संघ व मंगोलियाच्या सैन्याची सरशी झाली व जपानची उत्तर आशियातील चाल तेथेच थांबली.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Werner Elstner: Mongolei, S.16. Berlin 1993
  2. ^ Amelie Schenk, Galsan Tschinag, Udo Haase: Mongolei, Seite 24