Jump to content

शिवाजीराव पटवर्धन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


दाजीसाहेब पटवर्धन

शिवाजीराव पटवर्धन (इ.स. १८९२ - इ.स. १९८६) हे मराठी समाजसेवक व भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील कार्यकर्ते होते. यांचा जन्म २८ डिसेंबर १८९२ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. लहान वयात आई वडिलांचे छत्र हरविले त्यामुळं त्यांचा सांभाळ मोठी बहीण बहिनाक्का यांनी केला.[ संदर्भ हवा ] महाराष्ट्रातील अमरावती येथे इ.स. १९५० साली कृष्ठरोग्यांसाठी 'विदर्भ महारोगी सेवा मंडल तपोवन' निवासी सेवा आश्रम स्थापला. भारताला स्वातंत्र्य मिळाले नंतर शासनामध्ये कुठलेही लाभाचे पद न स्वीकारत त्यांनी आपले पुढील आयुष्य कुष्ठ सेवा करण्यात घालविले. जवळपास ६५,००० कुष्ठ रुग्णांना उपचाराबरोबरच व्यवसाय शिक्षणाचे धडे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम बनविले. त्याच बरोबर जवळपास २०,००० अनाथ, निराधार आणि आदिवासी मुलामुलींचे पालकत्व स्वीकारून त्यांना लहाणाचे मोठे करून त्यांना आपापल्या पायावर उभे केले. त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल भारताच्या केंद्रशासनाने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरवले.[ संदर्भ हवा ]

पटवर्धन पेशाने होमिओपॅथी वैद्यकशास्त्रातील वैद्य होते.[ संदर्भ हवा ] इ.स. १९२०पासून ते सक्रिय राजकारणात सहभागी झाले. ते काही काळ विदर्भ प्रांतिक काँग्रेस समितीचे सचिव होते.[ संदर्भ हवा ]

विदर्भ महारोगी सेवा मंडळ तपोवन आजही तेवढ्याच जोमानं आपले कार्य करत आहे.