Jump to content

सत्याम्बा व्रतकथा - अध्याय चवथा

विकिस्रोत कडून

<poem>


अध्याय चवथा

सूत म्हणतात :- ऋषी हो, आणखी मी एक कथा सांगतो; ती तुम्ही श्रवण करा. जिच्या योगाने शेवटी मोक्ष मिळतो. ॥१॥ त्या सूर्यकेतु राजाने आपल्या देशात स्वस्थता नांदावी म्हणून सत्यांबा देवीची स्थापना केली. त्या सूत उवाच ॥ अथान्यत्संप्रवक्ष्मामि चाश्चर्यफलदं द्विजाः ॥ श्रूतयां बहुयत्‍नेन येनान्ते मोक्षभाग्भवेत्॥१॥ राज्ञा स्वकीयदेशानां स्वस्तये स्थापिताऽम्बिका ॥ तद्दिनादद्यपर्यन्तं तस्य वंशस्य रक्षणम्॥२॥ स राजा हयेकदा भक्त्या स्वये देवालये मुदा ॥ पूर्णिमायां भृगोर्वारे व्रतारम्भमथाकरोत्॥३॥ एतस्मिन्नन्तरे तत्र सच्छूद्रो गुण्ड आगमत्॥ राजानं च नमस्कृत्य प्रोवाच विनयान्वितः ॥४॥ दिवसापासून आजपर्यंत त्याच्या वंशाचे रक्षण झाले. ॥२॥ तो राजा एकदा मोठया आनंदाने व भक्‍तीने स्वतःच्या देवालयात गेला आणि त्याने पोर्णिमेला शुक्रवारी सत्यांबाव्रताचा आरंभ केला ॥३॥ त्याच वेळी तेथे एक सदाचरणी 'गुंड' नावाचा शुद्र आला आणि तो (देवीस) व राजास नमस्कार करुन मोठया नम्रतेने म्हणाला ॥४॥ (गुंड म्हणाला:-) हे राजा, आपण काय करीत आहा, हे मला स्वस्थ अंतःकरणाने सांगा. मला देखील भक्‍ति उत्पन्न झाली आहे. तर हे राजा, हे कोणत्या देवाचे पूजन आहे ते सांगा. ॥५॥ याचा विधि कोणता व हयापासून गुण्ड उवाच ॥ राजंस्त्वं किं करोषीदं वद निश्चलमानसः ॥ ममापि भक्‍तिर्जाता हि को देवः पूज्यते प्रभो ॥५॥ किं फलं प्राप्यते हयस्माद्धिधिः को वा वदाधुना ॥राजोवाच॥ किमर्थ पृच्छसे चाद्य केच्छा वद सुनिश्चितम् ॥६॥ अस्य त्वाचरणेनैव वाञ्छिंतं प्राप्यते ध्‍रूवम् ॥ एतत्सत्याव्रतं सम्यक्पूजनीयं सुभावतः ॥७॥ गुण्डशूद्र उवाच ॥ भो राजन्प्रार्थयामि त्वां संततिर्नास्ति काय फळ मिळते हे सांगा, राजा म्हणाला, 'अरे तू हे का विचारतोस ? तुझी इच्छा काय आहे, हे निश्चये करुन सांग ॥६॥ हे केल्याने इच्छित फळ निश्चितपणे मिळते; म्हणून हे उत्तम व्रत भक्‍तीने करण्यासारखे आहे' ॥७॥ गुंड म्हणाला. 'हे राजा, मला संतति नाही. म्हणून तुला विनंती करितो की कृपा करुन हे मला सांगा. काही शंका न धरिता मी हे व्रत करीन' ॥८॥ त्यावर राजाने सर्व विधि सांगून त्यास प्रसादही दिला. त्याने भक्‍तीने सत्यांबादेवीस नमस्कार केला व तो आपल्या घरी आला ॥९॥ नंतर त्याने आपल्या स्त्रीस मे खलु ॥ कृपया वद सर्वं त्वं करो म्येवाविशङ्कया ॥८॥ राजा विधिं तदोवाच प्रसादं चापि दत्तवान्॥ सत्यांबां स नमस्कृत्य भक्‍तियुक्‍तो ययौ गृहम ॥९॥ तदा पत्‍नीं बन्धुवर्गांश्चोवाच व्रत मुत्तमम ॥ सर्वैश्च सह धर्मात्मा यथाविभवाविस्तरैः ॥१०॥ कृतावांस्तद्‌व्रतं सम्यक्पुत्रार्थी बहुभक्‍तितः ॥ ददौ प्रसादं सर्वेभ्यः स्वयं चैवग्रहीत्ततः ॥११॥ विसृज्य तद्‌व्रतं सर्वैर्भोजनं कृतवानसौ ॥ रात्रौ चानन्दयुक्‍तात्मा रेमे स निजभार्यया ॥१२॥ अर्न्तवत्‍नी व भावास वगैरे ते व्रत सांगितले. नंतर धर्मात्मा अशा त्या गुंडाने आपल्या वैभवाप्रमाणे (ऐपतीप्रमाणे) ॥१०॥ सर्वांसह मोठया भक्‍तीने पुत्राची इच्छा धरुन ते व्रत केले आणि सर्वास प्रसाद देऊन नंतर स्वतः ग्रहण केला ॥११॥ नंतर सर्वासह भोजन करुन त्या व्रताचे विसर्जन केले आणि रात्री मोठया आनंदाने तो आपल्या स्त्रीशी रममाण झाला. ॥१२॥ तेव्हां सत्यांबेच्या कृपेने त्याच्या स्त्रीस गर्भ राहिला. पुढे दहाव्या महिन्यांत तिला मुलगा झाला. ॥१३॥ मुलगा झाल्यावर मी पुन्हा असेच व्रत करीन, असा त्याने संकल्प केला. परंतु दुर्दैवाने तदा पत्‍नी जाता देव्याः प्रसादतः ॥ प्राप्ते तु दशमे मासे पुत्ररत्‍नमभूत्तदा ॥१३॥ पुत्रे जाते करिष्यामीत्युक्‍तमासीत्पुरा परम्॥ तदा दुर्दैवयोगेन विस्मृतं व्रतमुत्तमम्॥१४॥ तदा दुःखमभृदभूरि किमु वाच्यमतः परम्॥ विवाहसमये पुत्रो हयपस्मार्यभवदत्ता ॥१५॥ महारोगवशाच्छत्रुर्वधूं निष्कास्य नीतवान् ॥ तदा कलहमन्योन्यं प्राणान्तिकमभूद्बहु ॥१६॥ मिथ्यापवादी शत्रुश्च स्वयमेवाविचारतः ॥ त्या उत्तम व्रताचे त्यास विस्मरण झाले. ॥१४॥ त्यामुळे त्यास फार दुखः झालें, तें काय सांगावे ? लग्नाच्या वेळीं त्याच्या पुत्रास अपस्माराचा रोग झाला. ॥१५॥ त्याला रोग झाल्यामुळे त्या मुलाची भावी स्त्री शत्रूने हिरावून नेली. तेव्हां तो गुंड व त्याचा शत्रू हयामध्ये परस्पर फार निकराचे भांडण झाले. ॥१६॥ नंतर उलट गुंडाचा कुभांड रचणारा शत्रूचे, त्याचे जातिबंधु निवारण करीत असताही अविचाराने स्वतः गुंडास शिक्षा व्हावी म्हणून राजदरबारात-खोटी, लबाडीची फिर्याद घेऊन गेला. ॥१७॥ तो शत्रू अति लीनतेने राजास म्हणाला, मणिधर म्हणतो 'हे राजा, तुझ्या नगरात गुंड शुद्र फारच उन्मत्त आहे. ॥१८॥ बन्धुभिर्वार्यमाणोऽपि गतो राजसभां प्रति ॥१७॥ तदा विनयसंपन्नो भूपतिं वाक्यमब्रवीत् ॥ मणिधर उवाच ॥ भो राजंस्तेऽत्र नगरे वृत्‍त्या गुण्डोऽतिगर्वितः ॥१८॥ धनं च मे दुतं तेन नीतं दुष्‍टेन सांप्रतम्॥ उवाच भूपं गुण्डोऽपि स्नुषा नीता मम प्रभो ॥१९॥ मत्पुत्राय तु सा कन्या पूर्वं दत्ता च पितृभिः॥ अतस्त्वां शरणं यातो द्रव्यं चापि हृतं मम ॥२०॥ सत्यांबामोहितो राजा विचारं नाकरोत्तदा ॥ तस्य यच्च गृहे द्रव्यं तदानीतं त्वरेण त्या दुष्‍टानें हल्ली माझे द्रव्य हरुन नेले. नंतर गुंड म्हणाला, 'हे राजा, हया मणिधराने माझी सून हिरावून नेली. ॥१९॥ तिच्या आईबापांनी ती मुलगी अगोदरच माझ्या मुलास दिली आहे. हयाने माझे द्रव्यही नेले आहे; म्हणून मी तुला शरण आलो आहे. ॥२०॥ असे त्याने सांगितले तरी सत्यांबेच्या मायेने मोहित झालेल्या त्या राजाने कांही विचार केला नाही. गुंडाचे घरी असलेले सर्व द्रव्य राजाने हिरावून आणले ॥२१॥ आणि त्याला त्याच्या स्त्रीपुत्रांसह कैदेत टाकिले; तेव्हा ज्याच्या हातांपायांत शृंखला (बेडया) आहेत असा तो गुंड वै ॥२१॥ सपत्‍नीकं सुपुत्रं च निगडे त्यक्‍तवानसौ ॥ अहन्यहनि गुण्डोऽसौ शृङ्खलाबद्धपादकः ॥२२॥ राजाज्ञया च नगरे स्कन्धे कृद्दालधारकः ॥ अद्दष्‍टभावमापन्नो मृत्पाषाणक्रियां व्यधात्॥२३॥ एकस्मिन्नेव काले तु तृषार्तो ब्राह्मणालये ॥ आगतस्तत्र पूजां च दृष्‍टवान्बहुभक्‍तितः ॥२४॥ ब्राह्मणं च नमस्कृत्य प्रोवाच विनयान्वितः ॥ भो ब्रह्मञ्छृणु मे वाक्यं विस्मृतो दैवयौगतः प्रतिदिवशी ॥२२॥ राजाच्या आज्ञेमुळे खांद्यावर कुदळी घेऊन दुर्दैवामुळे नगरांत दगड व माती हयांची कामे करु लागला. ॥२३॥ कोणे एके वेळीं तो तान्हेला होऊन एका ब्राह्मणाचे घरीं पाणी पिण्यास आला. तेथे फार भक्‍तीने चाललेले सत्यांबेचे व्रत त्यानें पाहिले. ॥२४॥ तेव्हा ब्राह्मणास नमस्कार करुन तो गुंड फार नम्रतेने म्हणाला, 'हे ब्राह्मणा, माझी विनंती ऐक. मी दुर्दैवाने - हें व्रत करण्याचे - विसरलो ॥२५॥ म्हणून मी प्रार्थना करितो की, तुम्हीं हे सत्यांबाव्रत करा. आज मला राजाने पोट भरण्याकरितां जे द्रव्य दिले आहे, ते मी तुम्हांस देतो ॥२६॥ ते घेऊन व किंचित् कष्‍ट सोसून मला प्रसाद द्या.' असे तो म्हणतो आहे तोच शिपाई मोठया आढयतेने त्याला 'चल' असें म्हणाले ॥२७॥ ॥२५॥ अतस्त्वां प्रार्थयाम्यद्य सत्याम्बाव्रतमाचर ॥ अद्य मे हयुदरार्थं च राज्ञा दत्तमिदं धनम्॥२६॥ गृहाण कुरु यत्‍नेन प्रसादो दीयतां मम ॥ राजदूतास्तदा दर्पाद्गच्छ त्वमिति चाब्‍रुवन्॥२७॥ प्रार्थना च कृता तेषां किञ्चिद्दतं धनं तदा ॥ ब्राह्मणेन तदा भक्‍त्या तद्‌व्रतं कृतमुत्तमम् ॥२८॥ तदा प्रसादं सर्वेभ्यस्तस्मै शूद्राय चार्पयत् ॥ आशीरपि तदा दत्ता दुःखहा च पण त्याने त्यांची विनंती करुन त्यांसही थोडेसे धन दिलें आणि बाकीचें धन ब्राह्मणास दिले; नंतर त्या ब्राह्मणानेंही मोठया भक्‍तीने ते उत्तम व्रत केले ॥२८॥ नंतर सर्वांस प्रसाद देऊन त्या गुंड शूद्रास प्रसाद दिला आणि "तुझ दुःख नाहीसे होवो, तुला सुख मिळो असा आशीर्वाद त्यास दिला. ॥२९॥ त्याने ब्राह्मणास नमस्कार केला व तो पुन्हा तुरुंगात गेला आणि 'मी आज व्रत केले' असे त्याने आपल्या स्त्रीस व मुलास सांगितले ॥३०॥ व त्या व्रताच्या प्रभावाने उद्या माझे कार्य होईल' असें म्हणाला. त्याच रात्रीं श्रीसत्यांबा राजाच्या सुखप्रदा ॥२९॥ ब्राह्मणं च नमस्कृत्य गतोऽसौ निगडालयम्॥ पुत्राय पत्‍न्‍यै चोवाच कृतमद्य मया व्रतम्॥३०॥ तद्‌व्रतस्य प्रभावेण मत्कार्यं श्र्वो भविष्यति ॥ तद्रात्र्यां सा च सत्याम्बा स्वप्ने राजानमब्रवीत्॥३१॥ हे राजंस्त्वां वदाम्यद्य श्वः कार्यमविशङकया ॥ मद्‌व्रतं विस्मृतः शूद्रो बहुशिक्षा कृताऽधुना ॥३२॥ शरणं मामनुप्राप्तः श्वो देयं तस्य वै धनम्॥ निगडान्मुच्य स्वप्‍नात येऊन त्यास म्हणाली, ॥३१॥ 'हे राजा, मी सांगते हे कार्य तू' उद्या निःशंकपणें कर. माझे व्रत तो गुंड शूद्र विसरला होता, त्यामुळे मी त्यास शिक्षा केली होती ॥३२॥ आतां तो मला शरण आला आहे, तर त्याचे धन त्यास उद्या दे. त्यास कैदेतून मोकळे कर. असे न करशील तर मी तुझा नाश करीन' ॥३३॥ असे राजाला स्वप्‍नात सांगून ती सत्यांबादेवी गुप्त झाली. नंतर राजाने पहाटेस उठल्यावर प्रातःस्मरण करुन ब्रह्मचिंतन केले तामेष नो चेत्‍वां नाशयाम्यहम् ॥३३॥ स्वप्नमध्ये तु राजानमित्युत्त्क्वान्तरधीयत ॥ अथ प्रभाते राजा वै स्मृत्वा ब्रह्म सनातनम् ॥३४॥ स्वर्गादिकं ततः स्मृत्वा शौचं कृत्वा विधानतः ॥ सभामध्ये ययौ राजा स्वासने संस्थितस्तदा ॥३५॥ दूतानाज्ञापयामास सूर्यकेतुस्त्वरान्वितः ॥ रे दूता निगडाद्यूयं गुण्डमानीय ॥३४॥ नंतर स्वशरीरांत चतुर्दशभुवनात्मक विराट् पुरुषाचें चिंतन करुन स्वर्गादिकलोकांचे चिंतन केले. नंतर यथाविधि देहशुद्धि व स्नानसंध्यादि - विधि आचरुन राजा सभेमध्ये येऊन आपल्या सिंहासनावर बसला ॥३२॥ आणि त्या सूर्यकेतु राजाने लागलेच आपले दूतांस आज्ञा केली की, 'दूतांनो, कारागृहामध्ये 'गुंड' या नांवाचा शूद्र, त्याची स्त्री आणि पुत्र यासह कैद केलेला आहे. त्यास (सोडवून) लवकर इकडे आणा ॥३६॥ आणि त्यांच्या बेडया सोडा' याप्रमाणे दूतांस आज्ञा होतांच सत्वरम्॥३६॥ श्रृङ्खलामोचनं कार्यमित्युक्तैस्तैस्तथा कृतम् ॥ सपत्‍नीकं सपुत्रं च स्नापयित्वा यथाविधि ॥३७॥ वस्‍त्राद्याभरणैः सद्यस्तोषयामास तान्प्रति ॥ स्वाद्वन्नैर्भोजयित्वाथ शूद्रं पप्रच्छ वै नृपः ॥३८॥ किमर्थं वां दशा हयेषा तव जातेदृशी वद ॥ इति भूपवचः श्रुत्वा शूद्रः प्रोवाच दुःखितः ॥३९॥ मदोन्मत्तेन हि मया विस्मृतं त्वम्बिकाव्रतम् ॥ तेन त्यांनीं त्या गुंड शूद्रास स्‍त्रीपुत्रांसह कैदेंतून मुक्‍त केलें व त्यांस यथाविधि मंगलस्नान घातले. ॥३६॥ वस्त्र, अलंकार देऊन ताबडतोब संतुष्‍ट केले आणि स्वादिष्‍ट अन्नाने त्यांस भोजन घातलें. भोजन झाल्यावर राजाने त्या शूद्रास प्रश्न केला. ॥३८॥ 'हे गुंडा, तुझी ही अशी दशा का झाली ते सांग.' राजाचे हे भाषण श्रवण करुन तो शूद्र दुःखित होऊन म्हणाला ॥३९॥ हे राजा, संसाराच्या भरात मी मदोन्मत्त झालो; त्यामुळे पूर्वी नवस केलेल्या सत्यांबाव्रताचे मला विस्मरण झाले. त्या माझ्या कर्मामुळे मी या दशेप्रत पावलो आहे, ॥४०॥ हे राजा, आज मी आपणास शरण आलो आहे; तर आपणास वाटेल चास्मि दशामेतां गमितः स्वेन कर्मणा ॥४०॥ अद्य त्वां शरणं यातो यथेच्छसि तथा कुरु ॥ इति तस्य वचः श्रुत्वा संतुष्‍टो भूमिपस्तदा ॥४१॥ तस्यानीतं च यद्‌द्रव्यं तस्मै दत्तं विशेषतः ॥ द्विगुणीकृत्य चोवाच गतं दुःखं तवाधुना ॥४२॥ मणिधरात्कन्यकाऽऽनीता तस्य शिक्षा कृता तदा ॥ तत्पित्रा विधिना दत्ता पुत्रायास्य त्वरोगिणे ॥४३॥ ततस्तद्दिनमारभ्य सत्याम्बाव्रतमाचरत् ॥ स शूद्रोऽन्ते तसें करा.' असें त्या गुंडाचें भाषण ऐकून राजा संतुष्‍ट झाला; ॥४१॥ आणि त्यानें जें द्रव्य आणिलें होतें त्याच्या दुप्पट त्यास दिलें, आणि म्हणाला, 'आतां तुझें दुःख गेलें.' ॥४२॥ नंतर मणिधरापासून ती मुलगी आणिली, व त्यास त्यावेळी शिक्षा दिली. तिच्या बापानें पुन्हा गुंडाच्या निरोगी पुत्रास विधिपूर्वक ती मुलगी अर्पण केली. ॥४३॥ त्या दिवसापासून तो शूद्र हें सत्यांबाव्रत करुं लागला व हयाच्या प्रभावानें शेवटीं तो सत्यांबालोकांस गेला. ॥४४॥ सूत तत्प्रभावात्सत्याम्बालोकमाप्तवान् ॥४४॥ सूत उवाच ॥ एतत्सत्याव्रतं विप्रा भवद्भिश्च श्रुतं यतः ॥ महाकष्‍टस्य हरणमर्थदं पुत्रदं भुवि ॥४५॥ एतत्फलति वै सद्यौ दुःखदारिद्रयनाशनम्॥ भुक्तिदं मुक्तिदं चान्ते सत्यालोकप्रदायकम् ॥४६॥ अतः सर्वजनैः कार्यकार्यारम्भे फलप्रदम् ॥ संग्रामे विजये वादे संकटे भय आगते ॥४७॥ यद्यत्प्राप्तं यदा दुःखं तदा कार्यं सुभक्तितः ॥ व्रतानां चैव सर्वेषां फलदं भुवि म्हणाले - 'अहो ब्राह्मणांनो, तुम्हीं श्रवण केलेलें हें सत्यांबाव्रत हया लोकीं मोठें संकट हरण करणारें आणि पुत्र व धन देणारें आहे, ॥४५॥ तसेच हे शीघ्‍र फल देणारें व दारिद्रय आणि दुःख हयांचा नाश करणारें आणि मुक्‍ती देणारें असून शेवटीं सत्यांबालोकास नेणारें आहे. ॥४६॥ म्हणून सर्व लोकांनी हें सत्यांबाव्रत, कोणत्याही कार्याचे आरंभी करावें; म्हणजे तें कार्य सिद्धीस जातें, लढाईत व वादविवादांत जय मिळण्याचे वेळीं किंवा संकट व भय उत्पन्न होईल, ॥४७॥ अगर जेव्हां दुःख प्राप्त होईल, त्या त्या वेळीं हें मोठया भक्‍तीनें मुक्‍तिदम् ॥४८॥ दीनानां कृपया हयत्र शम्भुना प्रकटीकृतम् ॥ श्रवणादेव सर्वं स्याद व्रताचरणसत्फलम्॥४९॥ करावें. सर्व व्रतांमध्यें हें फळ देणारें व मुक्‍ति देणारें असें उत्तम व्रत आहे. ॥४८॥ गरीबांवर दया करण्याकरितां शंकरानें हे व्रत प्रसिद्ध केलें आहे. हया व्रताची कथा नुसती श्रवण करण्यानें देखील व्रत करण्याचें फळ मिळतें. ॥४९॥ ॥इति श्रीभविष्योत्तरपुराणे शिवषण्मुखसंवादे सत्यांबाव्रतकथायां चतुर्थोऽध्यायः ॥४॥

श्रीसत्याम्बार्पणमस्तु ॥ जय जय जगदम्बा समर्थ ॥ उदयोऽस्तु ।

उदयोस्तु । उदयोस्तु । श्रीः । श्रीः ॥ श्रीः ॥

समाप्त

आरती - दुर्गे दुर्घट भारी


आरती - श्रीसत्याम्बेची


<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.