पुणे :
‘भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रपुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी) संस्थेचा ‘सहयोग 2016’ माजी विद्यार्थी मेळावा नुकताच उत्साहात पार पाडला. या मेळाव्याला भारतातून विविध कंपन्यांतील सुमारे 150 माजी विद्यार्थी (Alumni) उपस्थित होते. हा मेळावा शेराव लॉन्स, एरंडवणे येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता.
माजी विद्यार्थी मेळावा ‘सहयोग 2016’ चे उद्घाटन डॉ. सचिन वेर्णेकर (भारती विद्यापीठ व्यवस्थापन शास्त्रशाखेचे अधिष्ठाता आणि ‘आय.एम.ई.डी.’चे संचालक) यांनी केले. मेळाव्याची सुरूवात सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आली. डॉ. सचिन वेर्णेकर यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांमधील उद्योजक, संचालक पदावर कार्यरत विद्यार्थ्यांचा (अर्श्रीापळ) यावेळी सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ. सचिन वेर्णेकर यांनी माजी विद्यार्थ्यांना (Alumni) ‘नेटवर्किंग’ विषयी मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.