अजित पवार

 


अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. त्यांचा जन्म २२ जुलै १९५९ रोजी महाराष्ट्रातील बारामती येथे झाला. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) प्रमुख नेत्यांपैकी एक आहेत. त्यांनी आतापर्यंत तीन वेळा महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद भूषवलं आहे. ते जुलै २०२३ पासून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी यापूर्वी २०१० ते २०१४ आणि २०१९ ते २०२१ असे दोन वेळा महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्रिपद सांभाळलं आहे. अजित पवार हे एका राजकीय कुटुंबाचे सदस्य आहेत. राजकीय पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून ते आले आहेत. त्यांचे काका शरद पवार हे देशाच्या राजकारणातील प्रमुख व्यक्ती आहेत. अजित पवार यांनी बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालयातून बॅचलर ऑफ कॉमर्स या पदवीचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्यांनी पुणे विद्यापीठातून व्यवसाय प्रशासन (Business Administration) या विषयातून पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९९० मध्ये अजित पवार यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे १९९१ मध्ये ते पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य म्हणून निवडून आले. त्यानंतर विधानसभेच्या निवडणूकांमध्ये ते अनेकदा निवडून आले. त्यांनी राज्य सरकारमधील अनेक विभागांमध्ये विविध पदांवर काम केले आहे. जलसंपदा मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा त्यांच्याकडे दांडगा अनुभव आहे.पवार त्यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय कौशल्यासाठी प्रसिद्ध आहेत. राज्यामधील वेगवेगळे सिंचन प्रकल्प यशस्वीपणे राबविण्याचे श्रेय त्यांना जाते. पण जलसंपदा मंत्री असताना सिंचन प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार केल्याचे आरोप करण्यात आले होते. कामामध्ये अनियमिततेच्या आरोपांसह अन्य वादांमध्येही ते अडकले होते. २०१९ मध्ये अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाशी युती करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्या या निर्णयाने सर्वजण आश्चर्यचकित झाले होते. पुढे काही दिवसांनी त्यांनी वैयक्तिक कारण देत या पदाचा राजीनामा दिला. महाविकास आघाडीने सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांनी ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असून महाराष्ट्रातील प्रमुख राजकिय व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. कार्यक्षम प्रशासक म्हणून त्यांचा लौकिक असला, तरीही कामाप्रमाणे त्यांची राजकीय कारकीर्द ही वाद, भष्ट्राचाराच्या आरोपांसाठी प्रसिद्ध आहे. अजित पवार हे महाराष्ट्र राज्यातील एक प्रमुख भारतीय राजकारणी आहेत.


Read More
Eknath Shinde remain Absence From NCP’s felicitation ceremony of former CMs
अजित पवारांच्या कार्यक्रमाकडे शिंदे यांची पाठ

शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे पाच माजी मुख्यमंत्री या गौरव सोहळ्याला निमंत्रण देवूनही…

Two former ministers and two former MLAs joined Ajit Pawar NCP
जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटाला धक्का…दोन माजी मंत्र्यांसह दोन माजी आमदारांचा अजित पवार गटात प्रवेश

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र, कोणी कुठेही गेले तरी आपण शरद पवार यांच्या बरोबरच राहणार असल्याचे ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

Girish Mahajan in Jalgaon claimed that Those who joined Ajit Pawar NCP group were in contact with BJP
अजित पवार गटात प्रवेश करणारे आधी भाजपच्या संपर्कात, जळगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांचा दावा

पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्यांना त्यांच्याकडून आगामी काळात मोठा निधी मिळू शकतो. परंतु, जिल्हा नियोजनचा निधी पालकमंत्रीच वितरीत करीत असतात, याकडे…

Pramod Patil Jalgaon district president of the NCP sharad pawar admitted that group has suffered losses in district
जळगावात शरद पवार गटाची हानी – जिल्हाध्यक्षांची कबुली

पक्षाची भूमिका मांडण्यासाठी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर अध्यक्ष एजाज मलीक यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

ashok Chavan ajit pawar
खा.चव्हाण यांचा पुतण्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर !

खासदार चव्हाण यांचे स्थानिक पातळीवरील एक पुतणे नरेन्द्र चव्हाण यांची अलीकडेच भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

Shiv Senas Bharat Gogawale mocked ajit Pawars CM statement asking which astrologer he consulted
आळंदी: अजित पवारांच्या वक्तव्याची भरत गोगावलेंनी उडवली खिल्ली; “अजित पवार कुठल्या ज्योतिषाकडे…”

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या विधानाची शिवसेना नेते भरत गोगावले यांनी खिल्ली उडवली आहे. अजित पवारांनी कुठल्या ज्योतिषाला विचारलं आहे,…

Is there a link between the resignation of Nashik District Bank administrators and the Ajit Pawar group
नाशिक जिल्हा बँक प्रशासकांच्या राजीनाम्याचा अजित पवार गटाशी संबंध? प्रीमियम स्टोरी

ग्रामीण राजकारणावर आपला प्रभाव राखण्यासाठी राष्ट्रवादीने (अजित पवार) जिल्हा बँकेला संकटातून बाहेर काढण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

Rohit Pawar On Pune Koyta Gang Video
Pune Koyta Gang Video : “हा बघा ‘कोयता गँग’चा कालचा थरार!”, Video शेअर करत रोहित पवारांची गृहमंत्री फडणवीस अन् अजित पवारांना विनंती

Pune Koyta Gang Video : पुण्यात दोन गटात सुरू असलेल्या हाणामारीचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी शेअर केला आहे.

Ajit Pawar on CM
Ajit Pawar : “कधी ना कधी योग येईल”, मुख्यमंत्रीपदावरुन अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास प्रीमियम स्टोरी

Ajit Pawar News : महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळावी, यावरही अजित पवारांनी त्यांचं रोखठोक उत्तर दिलं आहे.

Ajit Pawar expressed regret over the Chief Ministers post
Ajit Pawar: “मुख्यमंत्री व्हावं वाटतं, पण…”; अजित पवारांनी व्यक्त केली खंत

Ajit Pawar: मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात अजित पवार यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं आहे.”मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतं”, असं अजित पवार…

AI technology in farming news in marathi
एआय’च्या वापरासाठी कृषी क्षेत्रात पाचशे कोटी; पहिल्या टप्प्यात ५० हजार शेतकऱ्यांचा फायदा

महाराष्ट्र स्थापनेच्या ६५ व्या वर्धापन दिनानिमित्त पोलीस कवायत मैदान येथे अजित पवार यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली,

After the clarification of Deputy Chief Minister Ajit Pawar PDCC Bank has decided to refund the interest amount to farmers who have repaid crop loans through the bank
पीककर्ज फेडणाऱ्यांचे व्याज परत;‘पीडीसीसी’ बँकेचा निर्णय

आतापर्यंत ८० टक्के शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केली असून, व्याजासह पीककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजाची रक्कम बँकेमार्फत परत करण्याचा निर्णय बँकेने…

संबंधित बातम्या