चर्चेत असलेला विषय
Vivah Muhurat January 2025: जानेवारीत 10 विवाह मुहूर्त, पाहा यादी
Vivah Shubh Muhurat January 2025: विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातल महत्त्वाचा टप्पा. हिंदू धर्मात कोणतेही मंगल कार्य शुभ मुहूर्तावर केले जाते. विवाह देखील शुभ मुहूर्तावर करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, विवाह शुभ मुहूर्तावर केल्याने वैवाहिक जीवनात नेहमी आनंद टिकूण राहतो. अशात तुमच्याकडे देखील नवीन वर्षात कर्तव्य असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
Vivah Muhurat January 2025
Vivah Muhurat Jan'2025 in Marathi: हिंदू धर्मातील महत्त्वाच्या अशा 16 संस्कारापैकी एक म्हणजे विवाह संस्कार. विवाह हा प्रत्येकाच्या जीवनातल महत्त्वाचा टप्पा. हिंदू धर्मात कोणतेही मंगल कार्य शुभ मुहूर्तावर केले जाते. विवाह देखील शुभ मुहूर्तावर करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यतेनुसार, विवाह शुभ मुहूर्तावर केल्याने वैवाहिक जीवनात नेहमी आनंद टिकूण राहतो. अशात तुमच्याकडे देखील नवीन वर्षात कर्तव्य असेल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. या लेखात आपण जानेवारी 2025 मधील विवाह मुहूर्ताविषयी जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया अधिक माहिती.
विवाह मुहूर्त म्हणजे काय? (Marriage Muhurat List in Jan' 2025)
कोणतेही शुभ कार्य असो मुहूर्ताला महत्त्व आहे. त्यात लग्नाच्या वेळी विशेषतः मुहूर्त बघितला जातो. त्यामुळे मुहूर्त म्हणजे काय हा प्रश्न पडणे स्वभाविक आहे. तुम्हाला देखील हा प्रश्न पडला असेल तर काळजी करु नका. विवाह मुहूर्त म्हणजे ठराविक व विशिष्ट वेळ. या वेळेत विवाह संपन्न होणे शुभ मानले जाते. पृथ्वी स्वतःभोवती फिरत सूर्याला प्रदक्षिणा घालते याला आपण प्रदक्षिणा काळ व वर्ष म्हणतो. हेच वर्ष आपण महिना, दिवस, तास यामध्ये विभागत असतो. दिनमानानुसार पूर्वी हा काळ प्रहर घटिका, पळे यात मोडले जात होते. आता हे काळ विभाजन तास मिनिटे सेकंद या आधुनिक परिमाणांनी विभागले जाऊ लागले. त्यानुसार, विवाहासाठी निवडलेला शुभ काळ म्हणजे विवाह मुहूर्त.
जानेवारीत 10 विवाह मुहूर्त
तुमच्या घरात कर्तव्य आहे आणि तुम्ही विवाह मुहूर्त शोधत असाल तर काळजी करु नका. नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात म्हणजे जानेवारीमध्ये लग्नासाठी एक दोन नव्हे तर तब्बल 10 विवाह मुहूर्त आहे. जानेवरी हा विवाहासाठी उत्तम मानला जातो. कारण या महिन्यात मे महिन्या इतका तापमानाचा पार चढलेला नसतो. हल्लाददायक अशा या वातावरणात विवाह सोहळ्याची तयारी करणे सोपे होते. अशाच तुम्ही जानेवारी 2025 विवाहाची तयारी करत असाल तर जाणून घ्या या महिन्यातील विवाह मुहूर्ताची यादी.
जानेवारी 2025 विवाह मुहूर्ताची यादी
- 16 जानेवारी 2025, गुरुवार
- 17 जानेवारी 2025, शुक्रवार
- 18 जानेवारी 2025, शनिवार
- 19 जानेवारी 2025, रविवार
- 20 जानेवारी 2025, सोमवार
- 21 जानेवारी 2025, मंगळवार
- 23 जानेवारी 2025, गुरुवार
- 24 जानेवारी 2025, शुक्रवार
- 26 जानेवारी 2025, रविवार
- 27 जानेवारी 2025, सोमवार
Vikas Chavan author
Vikas Chavhan, हे सध्या टाइम्स नाऊ डिजिटलमध्ये सीनिअर करस्पॉन्डंट या पदावर काम करत आहेत. त्यांना प्रिंट आणि डिजीटल मिडियात 12 वर्षांहून अधिक काम केल्य...अधिक पiहा
लेखाचा शेवट
Subscribe to our daily Newsletter!
ताज्या मराठी बातम्या
4 वर्षांपूर्वीच झालं होतं लव्ह मॅरिज! दाम्पत्यानं घट्ट मिठी मारली अन् एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं...
Mumbai Local: शुक्रवार - शनिवारी लवकर कामावरून निघा; ब्लॉकमुळे लोकलच्या 277 फेऱ्या रद्द, शेवटची लोकल....
Mumbai Water Cut: तानसा जलवाहिनीला मोठी गळती; पाणीपुरवठा तत्काळ बंद, वाचा कोणत्या भागात आज पाणी येणार नाही
Encounter in Chhattisgarh: सुरक्षा दलाची मोठी कामगिरी, छत्तीसगडमध्ये 14 नक्षलवाद्यांचा खात्मा
सोन्याचा आजचा भाव (Gold Rate Today): सोने खरेदीचा विचार करताय? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा दर