Jump to content

आतिशी मारलेना

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

आतिशी मारलेना (८ जून, १९८१:दिल्ली, भारत - ) ह्या आम आदमी पार्टीच्या नेत्या आहेत. त्या पक्षाच्या राजकीय कामकाज समितीच्या सदस्या आहेत. त्यांनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्री तसेच मनीष सिसोदियाच्या शिक्षण खात्याच्या त्या सल्लागार म्हणून काम केले आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्या नंतर त्या दिल्लीच्या ८व्या मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत.[][][]. त्यांनी मुख्यतः वैकल्पिक शिक्षण आणि अभ्यासक्रमाच्या क्षेत्रात काम केले आहे. दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या जाहीरनाम्या तयार करण्यामध्येही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. मारलेना आम आदमी पक्षाच्या प्रवक्त्या देखील आहेत आणि अनेकदा त्या टीव्हीच्या वादविवादांवर दिसतात.

मारलेना यांनी काही काळ आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली विद्यालयात शिक्षण देण्याचे काम केले. तेथे त्यांनी सेंद्रीय शेती आणि प्रगतिशील शिक्षण प्रणाली यासारख्या गोष्टींमध्ये सहभाग घेतला आणि त्यांनी अनेक गैर-लाभकारी संस्थांबरोबर काम केले. मध्यप्रदेशातील भोपाळजवळील एका छोट्या गावात त्यांनी सामाजिक काम केले आहे.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Atishi's journey to the top: From an activist, advisor and AAP's force to the new CM of Delhi". The Economic Times. 2024-09-17. ISSN 0013-0389. 2024-09-17 रोजी पाहिले.
  2. ^ "The Aam Aadmi of AAP: 5 personal stories of sacrifice, triumph and validation". The Economic Times. 24 April 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 2016-09-04 रोजी पाहिले.
  3. ^ "AAP's Atishi To Be Delhi's New Chief Minister, Chosen By Arvind Kejriwal". NDTV.com. 2024-09-17 रोजी पाहिले.