Jump to content

इबेरियन द्वीपकल्प

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युरोपच्या नकाशावर इबेरियन द्वीपकल्प
इबेरियन द्वीपकल्पाचे उपग्रहाद्वारे टिपलेले छायाचित्र

इबेरियन द्वीपकल्प (स्पॅनिश: Península Ibérica), किंवा इबेरिया हा नैऋत्य युरोपातला एक द्वीपकल्प आहे ज्यावर स्पेन, पोर्तुगालआंदोरा हे तीन देश स्थित आहेत. इबेरियन द्वीपकल्पाच्या पूर्वेस व आग्नेयेस भूमध्य समुद्र तर उत्तर, दक्षिण व पश्चिमेस अटलांटिक महासागर आहेत. पिरेनीज ही पर्वतरांग इबेरियाची ईशान्येकडील सीमा ठरवतात. दक्षिणेला आफ्रिकेचा उत्तर किनारा इबेरियापासून जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.

इतिहास

[संपादन]

नावाची व्युत्पत्ती

[संपादन]

इबेरिया हा शब्द प्रथम ग्रीकांनी वापरला. रोमन ज्या भागाला हिस्पानिया म्हणत होते त्याच भागाला ग्रीक ’इबेरिया’ म्हणून ओळखत. रोमनपूर्व काळात या भागात राहणाऱ्या लोकांच्या स्थानिक भाषेत नदीसाठी जो शब्द वापरला जात होता त्यातून ’इबर’ या शब्दाचा उगम झाला असावा असे मानले जाते. या द्वीपकल्पातल्या सर्वात मोठ्या नदीला रोमनांनी इबर नदी (Iberus Flumen; सध्याची एब्रो नदी) असे नाव दिले. तसेच सध्याच्या उएल्वा राज्यात इबेरोस नावाचे एक गाव असल्याचा आणि या गावाजवळून वाहणारी इबेरुस नावाची एक नदी असल्याचा उल्लेख प्राचीन दस्तावेजांमध्ये सापडतो. त्यामुळे इबेर नदीचा प्रदेश म्हणून या द्वीपकल्पास इबेरिया नाव मिळाले असावे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: