Jump to content

क्रिस्टोफर रेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉन क्लोस्टरमनने १६८० काढलेले रेन यांचे व्यक्तिचित्र

सर क्रिस्टोफर रेन एफआरएस (३० ऑक्टोबर, १६३२ - ८ मार्च, १७२३) [] हे इंग्लिश स्थापत्यशास्त्रत्र, खगोलशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञ होते. यांना इंग्लंडच्या इतिहासातील सर्वात प्रसिद्ध वास्तुविशारदांपैकी एक समजले जाते. [] हे त्यांच्या इंग्लिश बरोक शैलीतील कामासाठी विशेषतः प्रसिद्ध आहेत. [] १६६६ च्या लंडनच्या महाआगीनंतर लंडन शहरातील ५२ चर्चच्या पुनर्बांधणीची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती,. त्यांनी बांधलेल्या चर्चमध्ये लुडगेट हिलवरील सेंट पॉल कॅथेड्रल हा सर्वोत्कृष्ट समजले जाते.[] []

रॉयल हॉस्पिटल चेल्सी (१६८२-९२)

या चर्चच्या पुनर्बांधणीतील सर्जनशील कामे मुख्यत्वाने त्यांच्या हाताखालील स्थापत्यशास्त्राँनी, विशेषतः निकोलस हॉक्समूर यांनी केल्याचे श्रेय दिले जाते. रेनच्या इतर उल्लेखनीय इमारतींमध्ये रॉयल हॉस्पिटल चेल्सी, ओल्ड रॉयल नेव्हल कॉलेज, ग्रीनविच आणि हॅम्प्टन कोर्ट पॅलेसच्या दक्षिण भागाचा समावेश आहे.

रेन यांनीऑक्सफर्ड विद्यापीठात लॅटिन आणि ॲरिस्टोटेलीय भौतिकशास्त्रात शिक्षण घेतले. हे रॉयल सोसायटीचे संस्थापक होते आणि १६८० ते १६८२ या काळात तेथील अध्यक्ष होते. आयझॅक न्यूटन आणि ब्लेझ पास्कल यांनी त्यांच्या वैज्ञानिक कार्याचा गौरव केला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ Here both Old Style and New Style dates are given, with "Old Style" meaning: according to the Julian calendar but with the year starting on 1 January. Dates elsewhere in this article are Old Style in the same way, except where both styles are given. Using New Style dates for Wren's birth and death, even though he lived in England in the Old Style era, avoids confusion about his age at death.
  2. ^ a b चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; britannica नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. ^ "6. The western towers, c.1685–1710 – St Paul's Cathedral". Stpauls.co.uk. 23 January 2024 रोजी पाहिले.
  4. ^ "Sir Christopher Wren (1632–1723)" (इंग्रजी भाषेत). 31 August 2018 रोजी पाहिले.