Jump to content

फ्रेंच विकिपीडिया

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
फ्रेंच विकिपीडिया
फ्रेंच विकिपीडियाचे बोधचिन्ह
स्क्रीनशॉट
प्रकार ऑनलाईन ज्ञानकोश प्रकल्प
उपलब्ध भाषा फ्रेंच
मालक विकिमीडिया फाउंडेशन
निर्मिती जिमी वेल्स, लॅरी सॅंगर
दुवा http://fr.wikipedia.org/
व्यावसायिक? चॅरिटेबल
नोंदणीकरण वैकल्पिक
अनावरण २३ मार्च, इ.स. २००१
आशय परवाना क्रिएटिव्ह कॉमन्स ॲट्रिब्यूशन शेअर-अलाइक ३.०

फ्रेंच विकिपीडिया (फ्रेंच : Wikipédia en français) ही विनामूल्य विकिपीडिया ऑनलाइन विश्वकोशांची फ्रेंच भाषेतील आवृत्ती आहे. विकिपीडियाच्या अधिकृत इंग्रजी संस्करणाच्या निर्मितीच्या दोन महिन्यांनंतर २३ मार्च २००१ रोजी ही आवृत्ती सुरू केली गेली.[] ४ एप्रिल २०२१ पर्यंत यात २३,१५,०६२ लेख होते, ज्यामुळे ही इंग्रजी, सेबुआनो, स्वीडिश आणि जर्मन विकिपीडिया नंतर ही पाचवी सगळ्यात मोठी आवृत्ती ठरली आहे, तसेच ही रोमान्स भाषासमूहातील सर्वात मोठी विकिपीडिया आवृत्ती आहे. याचा संपादनसंख्येनुसार तिसरा क्रमांक आहे आणि विकीपीडियातील लेखखोलीच्या बाबतीत ६व्या क्रमांकावर आहे. इंग्रजी विकिपीडिया आणि जर्मन विकिपीडिया नंतर ही १० लाख ज्ञानकोशीय लेखसंख्या ओलांडणारी तिसरी विकी आवृत्ती होती, आणि २३ सप्टेंबर २०१० रोजी ही घटना घडली. एप्रिल २०१६ मध्ये या प्रकल्पात ४,६५७ सक्रिय संपादक होते, ज्यांनी त्या महिन्यात कमीतकमी पाच संपादने केली.

२००८ मध्ये, फ्रेंच विश्वकोश क्विडने विकिपीडियाच्या फ्रेंच आवृत्तीसोबत स्पर्धेत मागे पडल्यामुळे कमी विक्रीचे कारण देऊन त्याची २००८ची आवृत्ती रद्द केली.[] एप्रिल २०२१ पर्यंत फ्रेंच विकिपीडियावर ४०,६०,००० वापरकर्ते, १५६ प्रशासक आणि ६३,९९५ संचिका होत्या.[]

२ डिसेंबर २०१४ रोजी, फ्रेंच-भाषिक विकिपीडिया ऑनलाईन ज्ञानकोश २०,२२,५०४ नोंदणीकृत वापरकर्त्यांसह[] प्रथमच जर्मन आवृत्तीला मागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची आवृत्ती झाली होती.[] []या पुढे फक्त इंग्रजी (२३,३००,४५६ वापरकर्ते)[] आणि स्पॅनिश (३४,०१,४९३ वापरकर्ते)[] या दोन भाषांच्या आवृत्त्या होत्या.

२०१३ च्या ऑक्सफोर्ड इंटरनेट इन्स्टिट्यूटच्या, ताहा यासरी आणि इतर संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, फ्रेंच विकिपीडियावरील सर्वात विवादास्पद लेख हे सागोलेन रॉयल (Ségolène Royal) आणि अज्ञात उडणारी वस्तू ([१]objet volant non identifié) होते.[]

सांख्यिकी

[संपादन]
ज्या देशांमध्ये फ्रेंच विकिपीडियाची सर्वाधिक लोकप्रिय आवृत्ती आहे ते देश गडद निळ्यामध्ये दर्शविले गेले आहेत.
फ्रेंच विकिपीडियावर देशानुसार पृष्ठ दृश्ये.

प्रेक्षक मोजमाप कंपनी मेडियामेट्रीने घरी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी इंटरनेट उपलब्ध असलेल्या फ्रान्समध्ये राहणाऱ्या ८,५०० वापरकर्त्यांच्या नमुन्यावर प्रश्न मांडले. मेडियामेट्रीने यांना असे आढळले की जून २००७ मध्ये, फ्रेंच विकिपीडियावर किमान एकदा साइटला भेट देणारी ७९,१०,००० अनन्य वापरकर्ते होते (जून २००६ मध्ये हा आकडा ४३,५५,००० होता); या कालावधी दरम्यान प्रत्येक वापरकर्त्याने २.७ वेळा विकिपीडियाला भेट दिली (जून २००६ मध्ये हा आकडा २.० होता); आणि विकिपीडिया फ्रान्स मध्ये ३० सर्वाधिक भेट दिलेल्या संकेतस्थळांपैकी १२ व्या (२००६ मध्ये २१वा क्रमांक होता) स्थानावर होती (इंटरनेट अनुप्रयोग वगळून) .

ऑगस्ट २०११ पर्यंत फ्रेंच विकिपीडिया फ्रान्समधील ७ व्या क्रमांकाचे सर्वाधिक भेट दिलेले संकेतस्थळ होते आणि महिन्यात जवळजवळ १.६ कोटी अनन्य वापरकर्ते होते (मेडियामेट्रीनुसार). एप्रिल २०१२ मध्ये, दरमहा २ कोटी अनन्य वापरकर्ते किंवा दररोज २४ लाख वापरकर्ते होते [१०]आणि ७० कोटीहून अधिक पृष्ठदृश्य होते. [११]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Wikipédia en français dépasse le million d'articles". ZDNet France. 2013-12-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ Litchfield, John. "France's favourite encyclopaedia falls victim to Wikipedia." The Independent. Wednesday 20 February 2008. Retrieved on 26 June 2013.
  3. ^ "Wikipedia Statistics - Tables - French". wikimedia.org.
  4. ^ "List of Wikipedias by edits per article". wikimedia.org.
  5. ^ fr:Spécial:Statistiques
  6. ^ de:Spezial:Statistik
  7. ^ Special:Statistics
  8. ^ "Estadísticas". es.wikipedia.org.
  9. ^ A bot will complete this citation soon. Click here to jump the queue arXiv:1305.5566v2.
  10. ^ "Wikipédia dépasse 20 millions de visiteurs/mois en France (Médiamétrie)". ZDNet. 31 May 2012. 4 September 2014 रोजी पाहिले.
  11. ^ "French Wikipedia at a glance". stats.wikimedia.org. 30 May 2012 रोजी मूळ पान पासून संग्रहित.

बाह्य दुवे

[संपादन]