Jump to content

बाणकोट किल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
बाणकोट किल्ला
बाणकोट चा किल्ला / हिम्मतगड
Part of मलाबार समुद्र किनारा
रत्नागिरी जिल्हा, महाराष्ट्र, भारत
बाणकोट किल्ला is located in Maharashtra
बाणकोट किल्ला
बाणकोट किल्ला
Coordinates 17°58′23.6″N 73°02′33.1″E / 17.973222°N 73.042528°E / 17.973222; 73.042528
प्रकार Sea fort
उंची 300 Ft.
जागेची माहिती
मालक भारत ध्वज भारत Government of India
द्वारे नियंत्रित

 Bijapur (-1548)
साचा:देश माहिती Portuguese Empire (1548-1699)
Janjira State (1699-1713)
साचा:देश माहिती Maratha Empire (1713-1755)
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम

भारत ध्वज भारत (1947-)
सर्वसामान्यांसाठी खुले Yes
परिस्थिती Ruins
Site history
साहित्य Stone

बाणकोट किल्ला / हिम्मतगड किल्ला / व्हिक्टोरिया किल्ला हा महाराष्ट्राच्या रत्‍नागिरी जिल्ह्यातील दापोलीपासून ४७ किलोमीटर (२९ मैल) अंतरावर आहे. हा किल्ला रत्‍नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. हा किल्ला सावित्री नदीच्या काठावर असलेल्या व्यापार मार्गाचे रक्षण करण्यासाठीची एक प्रमुख जागा आहे. हा मार्ग महाडपर्यंत जात होता, जो मध्यकालीन काळात व्यापारासाठीचा एक व्यस्त मार्ग होता. हा किल्ला समुद्राजवळील डोंगरावर आहे.

इतिहास

[संपादन]

या किल्ल्याचा सर्वात प्रथम लिखित उल्लेख ग्रीक प्रवासी टॉलेमीच्या प्रवास वर्णनात आढळतो. त्यावेळेस याचे नाव मंदारगिरी किंवा मंदगोर किंवा नानागुना असावे. चिनी प्रवासी युआन श्वांग याने स.न. ६४० मध्ये येथे वास्तव्य केल्याचे त्याच्या पुस्तकात नमुद केले आहे. हा किल्ला पोर्तुगीज लोकांनी विजापुरच्या मोहम्मद आदिल शाहकडून स.न १५४८ मध्ये जिंकुन घेतला. स.न. १७०० मध्ये मराठा कोळी सरदार[] कान्होजी आंग्रे यांनी हा किल्ला जिंकला आणि याचे नाव हिम्मतगड असे ठेवले. तुळाजी आंग्रे आणि पेशव्यांमधील असलेल्या वितुष्टामुळे पेशव्यांनी इंग्रजांबरोबर मिळून यावर हल्ला केला. स.न. १७५५ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या नाविक जेम्स याने काबीज केला. हे होण्यामागे सुवर्णदुर्ग किल्ला हारण्याचेही कारण आहे [] नंतर इंग्रजांनी याचे नाव व्हिक्टोरिया किल्ला असे ठेवले. नंतर इंग्रजांना लक्षात आले कि हा किल्ला ठेवणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही. त्यामुळे तो किल्ला पेशव्यांच्य ताब्यात देण्यात आला.[] स.न. १८३७ मध्ये मामलेदार कार्यालय बाणकोट किल्ल्यावरून मंडणगडावर हलवण्यात आले.

येथे कसे पोहोचाल

[संपादन]

सर्वात जवळचे शहर हरिहरेश्वर आहे. जे रस्त्यामार्गे मुंबई पासून २०१ किलोमीटर (१२५ मैल) आणि पुण्यापासून १९४ किलोमीटर (१२१ मैल) अंतरावर आहे. या किल्ल्याचे मूळ गाव दापोली पासून ४७ किलोमीटर (२९ मैल) आणि श्रीवर्धन पासून २१ किलोमीटर (१३ मैल) अंतरावर आहे. हरिहरेश्वरहून येथे येण्यासाठी सावित्री नदीमधील बागमंडळा ते बाणकोट फेरी सेवा घ्यावी लागते. दापोली आणि श्रीवर्धन येथे राहण्यासाठी चांगली हॉटेल्स आहेत. किनारपट्टीच्या रस्त्यावरील छोट्या हॉटेलमध्ये चहा आणि स्नॅक्स देखील उपलब्ध आहेत. ट्रेकिंगचा मार्ग बाणकोट गावाच्या पश्चिमेला असलेल्या टेकडीवरून सुरू होतो. गडापर्यंत आता खूपच सुरक्षित आणि रुंद रस्ता अस्थित्वात आहे. गडाच्या प्रवेशद्वाराशी जाण्यासाठी अर्धा तास लागतो.

पाहण्याची ठिकाणे

[संपादन]

किल्ला दगडांनी बांधलेला आहे. किल्ल्याभोवती खडकात खोदलेले खंदक आहेत. गडाला दोन दरवाजे आहेत. बाणकोट खाडीला लागून असलेली उत्तरी प्रवेशद्वार हे मुख्य द्वार आहे. पश्चिमेचा दरवाजा पठारावर उघडतो. मुख्य प्रवेशद्वारावर ओट्या आहेत. पुढे नगरखाना असून सावित्री नदी पाहण्यासाठी पायऱ्या चढून जाता येते. पश्चिम दरवाजावरून तटबंदीवर पोचता येते. बुशेशनजवळ एक गुप्त प्रवेशद्वार आहे. हा बुरूज सिद्दीने बाणकोट किल्ला मजबूत करण्यासाठी बांधला होता. वेलास येथे श्री रामेश्वर आणि काळभैरव देवतांना समर्पित अशी दोन मंदिरे आहेत जी अनुक्रमे मोरोबा दादा फडणीस आणि नाना फडणीस यांनी बांधली आहेत []

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ LT GEN K. J., SINGH. "As NDA cadet, I was witness to Vice Admiral Awati's kindness". ThePrint.In. 7 November 2018 रोजी पाहिले.
  2. ^ a b "The Gazetteers Department - RATNAGIRI". Cultural.maharashtra.gov.in. 2018-09-11 रोजी पाहिले.
  3. ^ "Bankot, Ratnagiri District, Western Ghats, India, Adventure, Trekking". trekshitiz.com. 2020-02-28 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2020-12-31 रोजी पाहिले.