Jump to content

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, सुदान ब्लॉक

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी ही महाविद्यालयीन पातळीवरील विद्यार्थ्यांमधून भारतीय संरक्षणदलांतील अधिकारी घडवण्याकरिता निर्मिलेली पुण्यातील सैनिकी प्रशिक्षणसंस्था आहे. कमिशन-पूर्व प्रशिक्षणासाठी संबंधित अकादम्यांमध्ये पाठवण्याआधी भूदल, वायुदल व नौदल या तिन्ही दलांसाठी या प्रबोधिनीत संयुक्त प्रशिक्षण दिले जाते. १९५४ साली प्रबोधिनीची स्थापना झाली. पुण्यात तिन्ही दलाचे प्रशिक्षण दिले जाते.


प्रवेश पात्रतेच्या अटी

[संपादन]

येथे प्रवेश देण्यासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे (यू.पी.एस.सी.) वर्षांतून दोन वेळा परीक्षा घेण्यात येते. परीक्षेची जाहिरात दीड ते दोन महिने आधी फक्त एकदाच एम्लॉयमेंट न्यूझ वर्तमानपत्रामध्ये येते. इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज, ‘सचिव, यू. पी. एस. सी., धोलपूर हाऊस, शाहजहान रोड, न्यू दिल्ली,’ या पत्त्यावर वेळेवर पाठविणे आवश्यक असते.

वयोमर्यादा

[संपादन]

यासाठी 17 वर्षे ते 19 वर्षे अशी वयोमर्यादा असते. बारावीला भौतिकशास्त्रगणित हे विषय असणे आवश्यक असते.

शैक्षणिक पात्रता

[संपादन]

प्रवेशासाठी - कोणत्याही शाखेची (आर्टस्, सायन्स, कॉमर्स, व्होकेशनल) इ. १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

शारीरिक पात्रता

[संपादन]

उंची कमीतकमी १५७.५ सें.मी. व वजन उंचीच्या प्रमाणात.

लेखी परीक्षा

[संपादन]

परीक्षा एकूण ९०० गुणांची असते. यामध्ये ३०० गुण गणित व ६०० गुण सामान्य क्षमता चाचणी असे दोन प्रत्येकी अडीच तासांचे पेपर्स असतात.

बाह्य दुवे

[संपादन]