२०१९ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकाभारत देशामधील सार्वत्रिक राष्ट्रीय निवडणुका होत्या. ११ एप्रिल ते १९ मे २०१९ दरम्यान एकूण ७ टप्प्यांत या निवडणुकांमधून सतराव्या लोकसभेमधील सर्व ५४३ खासदारांची निवड केली गेली. त्यापैकी ७८ खासदार
महिला आहेत ( इतिहासातील सर्वात जास्त महिला खासदार), २०१४ मध्ये ६१ खासदार होत्या. महिला होत्या निवडणुकांबरोबरच सिक्कीम, ओडिशा, आंध्र प्रदेश आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुकाही घेतल्या गेल्या.[१]
या निवडणुका ११ एप्रिल ते १९ मे दरम्यान घेतल्या जातील. मतमोजणी २३ मे रोजी सुरू होईल. बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान झाले. अनंतनाग मतदारसंघात तीन टप्प्यांत मतदान झाले. तर वेल्लोर मतदारसंघात खूप मोठी रक्कम मिळाल्यामुळे तेथील निवडणुक रद्द करण्यात आली.