Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? नक्की वाचा

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये अनेकवेळा शरिरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते. शरिरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे हृदयविकार,वजन वाढणे यासारख्या आजारांचा धोका वाढतो. शरिरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नेमकं काय करावे चला जाणून घेऊया.

शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी नेमकं काय करावं? नक्की वाचा
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 9:24 PM

हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरण थंड गार होऊन जाते. ऑक्टोबरमधील गर्मीमुळे हैराण झालेल्या नागरिकांना हिवाळ्यामध्ये काहीसा दिलासा मिळालेला पाहिला मिळतो. गरमीमुळे त्रस्त नागरिक हिवाळ्यामध्ये अनेकजण आपल्या मित्र किंवा कुटुंबियांसोबत लॉंग वेकेशनचा प्लॅन करतात. परंतु हिवाळ्यामध्ये कोलेस्ट्रॉल असलेल्या नागरिकांना काहीसा त्रास होतो. हिवाळ्यात शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा अधिक वाढते ज्यामुळे आजारपण येण्याची शक्यता अस्ते. परंतु शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढल्यामुळे त्याचा तुमच्या हृदयावर गंभीर परिणाम होऊ शकतो. चला तर जाणून घेऊया नेमकं कशामुळे हिवाळ्यात शरीरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते.

नियमित व्यायाम न करणे हिवाळ्यामध्ये अनेकवेळा वातावरणातील गारव्यामुळे सकाळी लवकर जाग येत नाही. अनेकजण तर संसर्ग होऊ नये म्हणून घराबाहेर पडत नाही. हिवाळ्यात नागरिकांमध्ये व्यायाम करण्याची मात्रा कमी होते. शरिराला नियमित व्यायाम न मिळाळ्यामुळे हार्मोन्स असंतुलित होतात. शरिरातील हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे फॅट जमा होण्यास सुरुवात होते आणि त्यामुळे कोलोस्ट्रॉल लेव्हल वाढतं.

तेलकट पदार्थांच्या सेवनामुळे हिवाळ्यात अनेकांना वातावरणातील गारव्यामुळे गरम गरम भजी किंवा वड्यांचा अस्वाद घेण्यास आवडतं. अनेकांना तर चमचमीत आणि मससालेदार पदार्थांची चटक लागते. परंतु जास्त प्रमाणात तेलकट खाल्ल्यामुळे शरिरातील फॅट वाढते. शरिरातील फॅट वाढल्यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा देखील वाढते आणि रुग्णांना त्रास होऊ शकतो.

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे हिवाळ्यात वातावरणात गारवा असतो. ज्यामुळे शरिराला योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश मिळत नाही. शरिराला योग्य प्रमाणात सुर्यप्रकाश नाही मिळाल्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता भासते. शरिरातील व्हिटॅमिन डीची मात्रा कमी झाल्यामुळे हार्मोन्स असंतुलित होण्यास मदत होते. शरिरातील व्हिटॅमिन डी कमी झाल्यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते.

शरिरातील हार्मोन्स असंतुलित होणे हिवाळ्याच्या दिवसांमध्ये वातावरणातील बदलामुळे अनेकवेळा शरिरातील हार्मोन्स असंतुलित होतात. वातावरणातील गारव्यापासून वाचण्यासाठी शरिरामध्ये अधिकप्रमाणात एनर्जी स्टोर होऊ लागते. शरिरामधील एनर्जी लेव्हल वाढल्यामुळे फॅट जमा होऊ लागते. शरिरात फॅट जमा झाल्यामुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा वाढते.

शरिरात फायबरची कमतरता आजकाल अनेकांच्या डायटमध्ये जंक फूडची मात्रा वाढली आहे. जंक फूडच्या सेवनामुळे शरिराला योग्य पोषण मिळत नाही. शरिरामध्ये फायबरची मात्रा कमी झाल्यामुळे अनेक आजार होण्याची शक्यता आहे. शरिरातील फायबरच्या कमतरतेमुळे कोलेस्ट्रॉलची मात्रा झपाट्यानने वाढू लागते.

शरिरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित कसे ठेवायचे? हिवाळ्यामध्ये शरिराला निरोगी ठेवण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारामध्ये पोषक पदार्थांचा समावेश करणं गरजेचे आहे. तुमच्या आहारामध्ये हिरव्या भाज्या, फळांचा आणि पोषक पदार्थाचा समावेश करा. हेल्दी डायट आणि नियमित लाईफस्टाईलमुळे शरिरातील कोलेस्ट्रॉलची मात्रा नियंत्रित ठेवण्यास मदत करते. दररोज सकाळी नियमित व्यायाम केल्यामुळे तुमचे शरिर आणि आरोग्य निरोगी रहाते.

रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..
रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा...
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही
शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही.
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल.
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव
बीड प्रकरणात सरकारला काय रस आहे माहीत नाही - भास्कर जाधव.
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा
धंगेकरांच्या पक्षप्रवेशावर संजय राऊत यांचा खळबळजनक दावा.
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी
निधी वाटपात भेदभाव? शिंदेंच्या मंत्र्यांना मिळाला सर्वात कमी निधी.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं.
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं
देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासात आरोपीच्या मित्रांना पोलिसांनी का घेतलं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला कोणत्या न्यायालयात चालणार?.
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'
खुर्च्यांची अदलाबदल शिंदेंच्या मनातून जाईना...म्हणाले; 'आता फक्त...'.