PAK vs IND Live Streaming | टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, टीव्ही आणि मोबाईलवर मॅच फ्री अशी पाहा

Asia Cup 2023 IND vs PAK Live Streaming | आशिया कप 2023 सुपर 4 मधील सर्वात मोठा सामना हा रविवारी 10 सप्टेंबर रोजी पार पडणार आहे. हा सामना टीव्ही आणि मोबाईलवर फुकटात पाहता येणार आहे. तो तसा आणि कुठे पाहायचा जाणून घ्या.

PAK vs IND Live Streaming | टीम इंडिया-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने, टीव्ही आणि मोबाईलवर मॅच फ्री अशी पाहा
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 1:40 AM

कोलंबो | रोहित शर्मा याच्या नेतृत्वात टीम इंडिया आशिया कप 2023 सुपर 4 मधील तिसऱ्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज आहे. पाकिस्तान आणि टीम इंडिया या स्पर्धेत आमेनसामने येण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी दोन्ही संघ साखळी फेरीत भिडले होते. मात्र पावसामुळे सामना पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे सामना रद्द करण्यात आला. आता या सुपर 4 मधील सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत सामना निकाली निघणार. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये या हायव्होल्टेज सामन्याबाबत कमालीची उत्सुकता आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना केव्हा?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 10 सप्टेंबरला सामना होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना कुठे?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया यांच्यातील सामना हा कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामन्याला दुपारी 3 वाजता सुरुवात होईल. तर 30 मिनिटांआधी 2 वाजून 30 मिनिटांनी टॉस होईल.

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना टीव्हीवर फ्री कुठे पाहता येईल?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया हा सामना फुकटात डीडी स्पोर्ट्सवर पाहता येईल.

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना मोबाईलवर फ्री पाहता येईल का?

पाकिस्तान विरुद्ध टीम इंडिया सामना हा मोबाईलवर फुकटात पाहायला मिळणार आहे. मात्र त्यासाठी तुम्हाला हॉटस्टार अ‍ॅप डाऊनलोड करावा लागेल.

टीम इंडिया विरुद्धच्या सामन्यासाठी पाकिस्तान प्लेईंग ईलेव्हन | बाबर आझम (कॅप्टन), शादाब खान (उपकर्णधार), फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), फहीम अशरफ, नसीम शाह, शाहीन शाह अफ्रीदी आणि हारिस रऊफ.

आशिया कप 2023 साठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.