Trupti Desai Video : ‘… तेव्हा का नाही पकडलं’, कराड दिंडोरीतील आश्रमात? तृप्ती देसाईंच्या आरोपांवर गुरुमाऊलींच्या मुलाचा खुलासा
तृप्ती देसाई यांनी दिंडोरीचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यावर आबासाहेब मोरे यांनी उत्तर दिलं
बीडच्या मस्सोजगाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या आणि भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी उडी घेतली आहे. वाल्मिक कराड संदर्भात तृप्ती देसाई यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेमध्ये मोठा गौप्यस्फोट केला. वाल्मिक कराडला वाचवण्याचे प्रयत्न होत आहेत, आणि या मागे दिंडोरीच्या आश्रमाचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ऊर्फ गरुमाऊली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. इतकंच नाहीतर त्यांनी पुरावे असल्याचेही म्हटलं आहे. बीड हत्या प्रकरणातील आरोपी विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड हे दोन दिवस दिंडोरीतील आश्रमात मुक्कामाला होते, असा दावा देसाईंनी केला. मगाच्या वर्षी आश्रमात जे काही चुकीचे प्रकार घडत होते, त्या प्रकरणात वाल्मिक कराड यानं मध्यस्थी केली, त्याचेच उपकार फेडण्यासाठी त्याला आश्रमात अश्रय देण्यात आला, असा आरोपही तृप्ती देसाई यांनी केला आहे. यावर आबासाहेब मोरे यांनी उत्तर दिलं आहे. ‘त्यांनी जो कालावधी सांगितला, त्या कालावधीत इथ दत्तजयंती सप्ताह सुरू होता, या काळात इथे लाखो भाविक येतात. ते गर्दीत दर्शनाला येवून गेले.मात्र आम्हाला त्याची कल्पना नाही. सीआयडीची टीम इथ येवून गेली, आम्ही त्यांना आश्रमातील CCTV फुटेज दिलं आहे. ते भाविक म्हणून येवून गेले.’, असे त्यांनी म्हटलं.
दरम्यान, तृप्ती देसाई यांनी आमच्याकडे महिलांनी तक्रारी आल्या असून त्यांनी दिंडोरीचे प्रमुख आण्णासाहेब मोरे ज्यांना गुरुमाऊली म्हटलं जातं त्यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत, असे म्हटले. यावरही आबासाहेब मोरे यांनी भाष्य केले आहे. तृप्ती देसाई यांनी लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप केले, त्यात काही तथ्य नाही. तृप्ती देसाई यांचे आरोप प्रसिद्धीसाठी आहेत. या आरोपांचे आम्ही खंडन करतो. हे मंदिर आहे, इथ आम्ही सामाजिक उपक्रम राबवतो, असे त्यांनी म्हटले.