Jump to content

अरेना नात्सियोनाला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
अरेना नात्सियोनाला
स्थान बुखारेस्ट, रोमेनिया, युनायटेड किंग्डम
बांधकाम सुरूवात २००८
बांधकाम पूर्ण ६ सप्टेंबर २०११
मालक बुखारेस्ट महापालिका
बांधकाम खर्च २३४.५ दशलक्ष
आसन क्षमता ५५,६३४
एक्झिक्युटिव्ह सुट ४२
विक्रमी प्रेक्षकसंख्या ५३,३२९ (रोमेनिया वि. नेदरलँड्स, १६ ऑक्टोबर २०१२)
वापरकर्ते संघ/स्पर्धा
रोमेनिया फुटबॉल संघ
एफ.सी. स्तेआवा बुकुरेस्त
एफ.सी. दिनामो बुकुरेस्त

अरेना नात्सियोनाला (रोमेनियन: Arena Națională) हे रोमेनिया देशाच्या बुखारेस्ट शहरामधील एक फुटबॉल स्टेडियम आहे. ५५,६३४ आसनक्षमता असलेले हे स्टेडियम रोमेनियाचे राष्ट्रीय मैदान असून रोमेनिया फुटबॉल संघ आपले यजमान सामने येथून खेळतो. हे स्टेडियम युएफाच्या क्रमवारीमध्ये प्रतिष्ठित दर्जाचे आहे.

आजवर येथे २०१२ सालचा युएफा युरोपा लीगचा अंतिम सामना तसेच इतर अनेक महत्त्वाचे सामने खेळवले गेले आहेत. युएफा यूरो २०२० साठी निवडण्यात आलेल्या १३ यजमान शहरांपैकी बुखारेस्ट एक असून अरेना नात्सियोनालामध्ये ह्या स्पर्धेचे एकूण ४ सामने खेळवण्यात येतील.

बाह्य दुवे

[संपादन]