फ्रांसिस्को गोया
फ्रांसिस्को गोया | |
गोयाचे आत्मव्यक्तिचित्र | |
पूर्ण नाव | फ्रान्सिस्को होजे दे ला गोया इ लुसिएन्तेस |
जन्म | मार्च ३०, १७४६ फुएन्देतोदोस, स्पेन |
मृत्यू | एप्रिल १६, १८२८ बोर्दो, फ्रान्स |
राष्ट्रीयत्व | स्पॅनिश |
कार्यक्षेत्र | चित्रकला |
प्रशिक्षण | 'ला माहा देस्नुदा'(१७९७-१८००), 'ला माहा वेस्तिदा' (१८००-१८०५), '२ मे, १८०८ (चित्र)' (१८१४), '३ मे, १८०८ (चित्र)' (१८१४), 'ला फामिलिया दे कार्लोस ४' (१७९८) |
फ्रान्सिस्को गोया
जीवन
[संपादन]युद्धाच्या आघाताचा साक्षीदार
[संपादन]फ्रान्सिस्को गोया हा इतिहासातील महत्त्वाचा चित्रकार मानला जातो कारण नेपोलियन आणि स्पॅनिश यांच्या युद्धात जनतेची होरपळ त्याने चित्र रूपाने नोंदवून ठेवली. ही सर्व चित्रे युद्धाची आपत्ती (द डिझास्टर ऑफ वॉर) या नावाने प्रसिद्ध आहेत. ही चित्रे तो काढत असताना खरे तर तो स्पेनच्या राजदरबारात चित्रकार होता. पण गोयाला एकूणातच युद्धाचे परिणाम भयानक वाटले असावेत त्याने या चित्रांच्या रूपाने या विरुद्ध आपला आवाज नोंदवून ठेवला. परंतु ही चित्रे त्याच्या मृत्यू नंतर सुमारे ३५ वर्षांनी प्रसिद्ध केली गेली.
गोयाने आपल्या चित्रात मृत्यूच्या क्षणांचे नेमके चित्रण केले आहे तसेच युद्धकाळात स्त्रीयांवरचे अत्याचारही नोंदवून ठेवले आहेत. उदा. प्लेट ९: No quieren - 'त्यांना नको आहे' या चित्रात एक सैनिक एका स्त्री वर बळजोरी करतो आहे आणि एक म्हातारी त्याच्या अंगावर चाकू घेऊन धावते आहे असे चित्रण आहे. पुढील दहाव्या प्लेट मध्ये अत्याचाराला बळी पडलेल्या स्त्रीया अत्याचार संपल्यावर निःस्त्राण होऊन पडलेल्या आहेत.
विषय
[संपादन]गोयाने दुष्काळ, अमानवी शिक्षा, देहदंडाच्या शिक्षा याचेही चित्रण केले आहे. गोयाच्या चित्रात युद्धामध्ये एकमेकांना भिडलेली शरीरे आणि काळा रंग याचा प्रभावी वापर दिसतो. रेनेसांस संपल्या नंतरचा या चित्रकारावर अर्थातच युरोपीय मध्ययुगीन शिल्पकलेचा ठसा उमटलेला दिसतो.
गोयाची ही चित्रे अम्लरेखन (इचिंग) आणि धातूवर रेषा कोरून (एन्ग्रव्हिन्ग) या तंत्राने बनवलेली आहेत.
परिणाम
[संपादन]गोयाच्या चित्रणाने भारून जाऊन जाक कॅलो (Jacques Callot) या चित्रकाराने युद्धाचे काही चित्रण करून ठेवले आहे. त्यातले Les Grandes Misères de la guerre हे चित्र युद्धाचे यथार्थ वर्णन करते.
बाह्य दुवे
[संपादन]- प्रिंटची 'छाप' Apr 22, 2012 मटा[permanent dead link]
- लॅंग्वेज कॉर्नर : परिचय जगविख्यात स्पॅनिश चित्रकारांचा (भाग-२) लोकसत्ता नीलिमा (गुणे) गोळे , शुक्रवार , २३ जुलै २०१०
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |