व्हॉयेजर २
Appearance
व्हॉयेजर २ हे नासाने सोडलेले अंतरिक्षयान आहे. हे यान २० ऑगस्ट, १९७७ रोजी सोडण्यात आले. त्याचे जुळे यान व्हॉयेजर १ यानंतर १६ दिवसांनी सोडण्यात आले होते.
व्हॉयेजर २ला गुरू ग्रहापर्यंत पोचायला व्हॉयेजर १ पेक्षा जास्त वेळ लागला. व्हॉयेजर २ हे गुरू, शनि नंतर युरेनस आणि नेपच्यून या ग्रहांजवळूनही गेले. युरेनस व नेपच्यून यांना भेट देणारे हे एकमेव मानवनिर्मित यान आहे.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |