Jump to content

मलंगगड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(श्रीमलंगगड या पानावरून पुनर्निर्देशित)
श्री क्षेत्र मलंग गड
चित्र:श्री मलंग गड.JPG
श्री मलंग गड
नाव श्री क्षेत्र मलंग गड
उंची ३२०० फूट
प्रकार गिरिदुर्ग
चढाईची श्रेणी सोपी
ठिकाण ठाणे, महाराष्ट्र
जवळचे गाव मलंग गाव,बदलापूर,कल्याण
डोंगररांग माथेरान
सध्याची अवस्था व्यवस्थित
स्थापना {{{स्थापना}}}


मलंगगड हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.

मलंगगड महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील एक किल्ला आहे.

मलंगगड हे धार्मिक स्थान श्री मछिद्रनाथ यांच्या नावाने ओळखले जाते. मलंगगड हा किल्ला शिलाहार राजाने ३ र्या शतकात बांधला. येथे मच्छिंद्रनाथांचे पुरातन मंदिर, समाधि मंदिराच्या घुमट असुन त्याच्या च्या वर कलश आहे याच कलसावर चांदिचा मत्स्य आहे ,मंदिरातमच्छिंद्रनाथ यांची समाधीआहे. येथील मलंग मच्छिंद्रनाथ समाधीची यात्रा माघ पौर्णिमेला असते. या यात्रेत नाथांची पालखी निघते. या पालखीवर ॐकार आहे व नाथ संप्रदायाची चिन्हे आहेत. या स्थानाचा मालकी वाद हा ठाणे न्यायालय यात चालू असून त्या ठिकाणी हिंदू पक्षकार म्हणून प्रसिद्ध इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे हे पाहत आहेत. दर पौर्णिमेला या समाधीची आरती होते व समाधीवर भगवे वस्त्र अर्पण केले जाते. या समाधीच्या पूजेचा मान आजही केतकर या हिंदू ब्राम्हण घराण्याकडे आहे.

स्थान

[संपादन]

मलंगगड कल्याणपासून दक्षिणेस १६ कि.मी. अंतरावर एका उंच डोंगरावर बांधलेला आहे आणि तो पनवेल वरुण वावंजे गावपासून २ कि.मी.च्या अंतरावर आहे, बदलापूरच्या नैर्ऋत्येस व मुंबई आणि साष्टीच्या पूर्वेस हा किल्ला आहे. करंजा व उरण नैर्ऋत्येस आणि बोरघाट, भीमाशंकर व माळशेज घाट पूर्वेस असा हा भाग एकेकाळी लढाईच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा होता.

इतिहास

[संपादन]

ॲबिंग्डन ह्या इंग्रजी अधिकाऱ्याने १७८० मध्ये मलंगगडाला वेढा घातला. पावसाळ्यात मराठे युद्ध टाळतात हे लक्षात घेऊन बेसावध मराठ्यांवर भर पावसातच हल्ला करण्याचे त्याने ठरवले. लढाई सुरू होताच नैर्ऋत्येच्या व उत्तरेकडच्या वाटा बंद करून टाकल्या. त्याने प्रथम पीरमाची घेण्याचे ठरवले. तेथे पांडुरंग केतकर यांस ३०० माणसांनिशी नेमलेले हाते. अचानक हल्ला झाल्यामुळे मराठ्यांनी प्रतिकार केला नाही. १२५ जण सोने माचीकडे धावले. तर बाकी गडावर जागा नव्हती म्हणून कल्याणच्या मामलेदाराकडे धावले. ॲबिंग्डनने गडावर पोहचण्यासाठी गडाच्या पायथ्यापासून पीर माचीपर्यंत वाट शोधून काढली. नाना फडणविसाने वेढा उठवण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. ॲबिंग्डनने पीर माचीच्या पठारावर तीन तोफा चढवल्या व सोने माचीवर गोळीबार चालू केला. पण प्रवेशद्वार मोठ्या खुबीने बांधले असल्यामुळे तेथवर गोळे पोहचेनात. मराठ्यांना जंगलातल्या अनेक चोरवाटा माहीत असल्यामुळे त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटण्याचा संभव नव्हता. किल्लेदाराने आनंदराव धुळप व काशीपंत यांच्याकडे मदत मागितली पण त्यांनी प्रत्यक्ष न येता ७०० शिपाई पाठवले जे तेथवर पोहचू शकले नाहीत. कॅप्टन ॲबिंग्डनने शिडा लावून २५० माणसे सोने माचीवर चढवली. पण मराठ्यांनी गडावरून दगडधोंड्यांचा वर्षाव करून त्यांना परत पाठवले. ॲबिग्डनने पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. गंगाधररावाने संधी साधून दाणापाणी व दारूगोळा भरून घेतला. नाना फडणीसांनी बाळाजी विश्वनाथ पाठक व राधो विश्वनाथ गोडबोले यांना सैन्य देऊन वेढा उठवण्यास पाठवले. त्यांच्या फौजा शिरवळ या मलंगच्या उत्तरेला असलेल्या गावी पोहचल्या. मराठांची फौज तीन हजारावर होती. त्यांनी शत्रूला हुसकावून लावण्याचे प्रयत्न केले पण ते अयशस्वी झाले. १६ सप्टेंबरला गारांची एक पलटण पीर माचीवर चाल करून गेली. त्यांनी तोफांवर हल्ले केल्यामुळे ब्रिटिशांनी घाईघाईने तोफा काढून घेतल्या.

मेजर वेस्टफॉलने ॲबिंग्डनच्या मदतीसाठी जादा कुमक धाडली. या सेनेने रसद घेऊन येणाऱ्या मराठांच्या तुकडीला उद्ध्वस्त केले. त्यामुळे मलंगगडावर अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. काही धान्य पावसाने नासले, खजिना संपत आला. मराठ्यांनी इंग्रजांचेही दळणवळण तोडून टाकले होते. तेव्हा कर्नल हार्टलेने बेलापूर, पनवेल, तळोजे मार्ग सुरक्षित केला. शिरवळच्या मराठ्यांच्या तळावर हल्ला करून त्यांना हुसकावून लावले.

आता ब्रिटिशांनी कॅप्टन कारपेंटरच्या हुकमतीत मलंगगडावर दुसरा हल्ला चढवला. तोफांचा भडिमार सुरू केला. तटाला भगदाड पडले की आत घुसायला ३५० सैनिक तयार ठेवले होते पण केतकरांनी किल्ला शौर्याने लढवला. इंग्रजांचे बरेच सैनिक कामी आले. तेव्हा इंग्रजांनी हल्ले थांबवले. पण वेढा मात्र उठवला नाही. पीर माचीवरून तोफा काढून घेतल्या. मराठ्यांची नाकेबंदी करून त्यांची उपासमार करून त्यांना शरण यायला लावावे असे इंग्रजांनी ठरवले. ऑक्टोबरनंतर किल्ल्यावर उपासमार होऊ लागली. बाहेरून गंगाधर कार्लेकर काही मदत पाठवू शकले नाहीत. शेवटी नाना फडणविसाने काही सरदारांना हाताशी घेऊन मोठी फौज जमा केली आणि मलंगगड व वसईवर धाडली. स्वतः नाना व हरिपंत फडके दहा हजार फौजेसह खंडाळ्याला आले व त्यांनी राजमाची घाट उतरून कल्याणकडे जायचे ठरवले. त्यामुळे हार्टलेला प्रतिशह दिला जाणार होता. ताबडतोब हार्टलेने मलंगगडावरून सैन्य काढून घेतले व लगेचच मराठांनी मलंगगडाकडे जादा कुमक व रसद धाडली. अशाप्रकारे मराठांनी अखेरपर्यंत मलंगगड शर्थीने लढवला.

गडावरील पहाण्यासारखी ठिकाणे

[संपादन]

माचीवरून सरळ पुढे जात पलीकडचे टोक गाठायचे. तेथून एका चोर वाटेने खाली उतरले की गडाच्या निम्म्या उंचीवर एक आश्रम लागतो. तिथून गडाच्या दक्षिण व उत्तर टोकाच्या दिशेने वळसा घेत जाणाऱ्या वाटा निघतात. पहिली वाट खाली वावंजे गावात जाते. तेथून पनवेलला जायला एस टी मिळते. उत्तर दिशेच्या वाटेने गेले की दोन वाटा फुटतात. सरळ जाणारी वाट गडाला वळसा घालून पालखीसारख्या आकाराच्या खडकाखालून किल्ल्यावर जाते. उजवीकडे खाली उतरणारी वाट मलंगगड व गणेश कार्तिक सुळक्यांचा डोंगर यांच्यामधील खिंडीत पोहचते. माचीवरून बालेकिल्याकडे जाण्यासाठी कडाला उजवीकडे ठेवत वळसा घालून गेले की खोदीव पायऱ्या दिसतात. पायऱ्यापुढे एक गुहा व पाण्याचे टाके आहे. येथून पुढे जाणे कठीण आहे. पन्नास साठ पायऱ्यांनंतरच्या पायऱ्या तुटलेल्या आहेत. तो भाग चढण्यासाठी दहा बारा फुटांचा एक पाईप आडवा टाकलेला आहे आणि हातांच्या आधारासाठी दोर लावला आहे. हा अवघड टप्पा पार करून दहा मिनिटांत गडमाथ्यावर पोहचता येते. शिरोभाग तसा लहान आहे. छप्पर उडालेले पण भिंती शाबूत असलेला एक वाडा दिसतो. त्याच्या मागे खोदलेली सात टाकी आहेत. बालेकिल्याच्या मध्यभागी औदुंबराचे झाड आहे.श्रीगणेश मंदिरसुद्धा आहे.आणि काही ठिकाणी तटबंदीही आहे. बालेकिल्याच्या समोरच देवणीचा सुळका आहे. येथे येणारे भाविक या समोरच्या देवणीवर एक दगड फेकून मारण्याचा सोपस्कार करतात. दगड जर देवणीवर पोहोचला तर मनातली गोष्ट साध्य होते असे म्हणतात. पूर्वेकडून नैर्ऋत्येकडे गोरखगड, राजमाची, माथेरान, पेब, इर्शाळ, प्रबळगड हा परिसर दिसतात.

गडावर जाण्याच्या वाटा

[संपादन]

कल्याणहून सकाळी अर्ध्या तासात बसने गडाच्या पायथ्याशी पोहचता येते. पनवेल वरुण वावंजे गावांसाठीही बसची सोय आहे, वावंजे गावपासुन २ किमी अंतरावर गडाचा पायथा आहे, पायथ्यापर्यंत रिक्षाची सोय आहे, गडाच्या निम्म्या उंचीवर कनीफनाथ समाधि स्थान। जे संप्रत बख्तावर म्हणून प्रसिद्ध आहे त्याच्या पूढ़े जलंदरनाथ समाधि जी सुलतान शाह म्हणून ओलखली जाते आनी सर्वातवर सुप्रसिद्ध श्री मलंग नाथांची समाधि आहे. तिथपर्यंत पायऱ्या आहेत. वाटेत दुकाने आहेत. एक देवीचे मोठे मंदिर आणि शंकराचे लहान देऊळ आहे. वरच्या या बाजूला श्री गणपति मारुति che स्वयंभू मंदिर ahe भविकांची भरपूर वर्दळ असते. मलंग समाधि स्थानाच्या अलीकडे दुकानांच्या रांगेतून एक बोळ उजवीकडे जातो. तेथे घरे आहेत आणि विहीरही आहे. वाट समोरच्या डोंगराला लागून उजवीकडून वर चढायला लागते. पधंरा वीस मिनिटांत पहिला चढ पार करून वरच्या उभ्या कड्यापाशी पोहचता येते. तसेच श्री मलंगगडाच्या दक्षिणेच्या समोरील बाजूस पनवेल तालुक्यातील (शिरवली गाव) आहे त्या गावा समोर एक आदिवासी कोंडपवाडी आहे त्या ठिकाणाहून एक सोपी पायवाट आहे. पूर्वी रोजी रोटी साठी गावकरी गडावर याच वाटेतून जात असत

राहण्याची सोय

[संपादन]

येथे राहण्याची सोय आहे

जेवणाची सोय

[संपादन]

येथे जेवणाची सोय आहे. गडावर लहान मोठी हॉटेले आणि इतर दुकाने आहेत.

पाण्याची सोय

[संपादन]

गडावर अनेक टिकाणी पाण्याची टाकी आहेत. यातील पाणी पिण्यासाठी वापरता येऊ शकते.

जाण्यासाठी लागणारा वेळ

[संपादन]

पायथ्यापासून २ तास.

संदर्भ

[संपादन]

हे सुद्धा पहा

[संपादन]